Breaking News

दिल्लीगेटजवळील शमी गणपती

अहमदनगर, दि. 01, सप्टेंबर - नगरच्या अष्टविनायकांपैकी शमी गणपती हे एक जागृत स्थान आहे.दिल्ली दरवाज्याजवळ  असणार्या देशमुख गल्ली मधे हे मंदिर   आहे.गणेश भक्तांचे हे श्रद्धास्थान आहे.
या गणेश मूर्तीबाबत अशी अख्यायिका सांगितली जाते की, या आवारात शमीचे मोठेे झाड होते.  या झाडाच्या मूळापासून गणेश मूर्ती तयार झाली. पुढे भक्तांनी त्यास  शेंदूर लावून श्री शमी गणपती म्हणून नाव दिले.आजही शमीचे हे झाड अत्यंत दिमाखाने उभे आहे.पूर्वी या ठिकाणी देवडीवजा मंदिर होते.आज संगमरवरी मंदिर आहे.
श्री शमी गणपतीचे महत्व फ़क्त बहरतापुरतेच मर्यादित राहिलेले नाही.देशविदेशामधे हे दैवत लकांच्याऽऽ श्रदधेचे स्थान आहे. शमी गणपती ट्रस्ट नगरमध्ये वेगवेगळ्या  सामाजिक संस्थांना अर्थिक व अन्य मदत करत असते.यामध्ये गरिब होतकरु मुलांना शिक्षण, दुष्काळामधे दुष्काळग्रस्तांना मदत,गरिबांना वैद्यकिय मदत,अन्नदान अशा  प्रकारची सामाजिक मदत केली जाते.भक्तीभावाबरोबर सामाजिक बांधिलकी जपली जाते.आज या ट्रस्टचे सामाजिक कार्य इतर गणेशमंडळांना प्रेरणा देत आहे.  गणेशोत्सवात याठिकाणी यज्ञयाग,पूजा-अर्चा इत्यादी धार्मीक कार्यक्रम होतात.शेकडो भाविक याठिकाणी दर्शन घेण्यास येतात.नित्यसेवा व नित्यदर्शनास भाविक मोठ्या  प्रमाणात गर्दी करतात.श्रद्धेने भक्ती करणार्या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी भक्तांची धारणा आहे.थायलंड ,मलेशिया या ठिकानावरुन भाविक दर्शनास  येतात.