Breaking News

विसर्जन मिरवणूकीत स्वयंशिस्त बाळगावी : कांबळे

अकोले, दि. 02, सप्टेंबर - गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी स्वयंशिस्त बाळगावी तसेच  उत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी घेत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन तहसीलदार मुकेश कांबळे यांनी केले.
गणेश विसर्जन व बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर आयोजित तालुका शांतता समिती बैठकीत अध्यक्षस्थानाहून मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष के डी धुमाळ,पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा डी के वैद्य, राजूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत जाधव, अकोलेचे उप निरीक्षक नितीन बेंद्रे, विकास काळे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार कांबळे म्हणाले की, गणेश विसर्जन मिरवणुकी पूर्वी रस्त्यांवरील खड्डये बुजविले जाणार असून अग्निशमन दल पाचारण करू तसेच मिरवणुकीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणार्‍या स्वयंसेवकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करू असेही ते म्हणाले.
पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी महिलांच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्न करू, वाहन चालकांनी  आपली वाहने  विसर्जन काळात रस्त्याला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन केले. अवैध दारूच्या 60 केसेस केल्या आहेत. 17 जणांवर तात्पुरत्या स्वरूपात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.
यावेळी नगराध्यक्ष ऍड. के डी धुमाळ, माजी सरपंच संपतराव नाईकवाडी, प्रा.डी के वैद्य, निखिल जगताप, आरिफ तांबोळी, अकोले महाविद्यालयाचे प्रभारी उप प्राचार्य डॉ सुनील शिंदे, अ‍ॅड.पुष्पा चौधरी, अगस्ती विद्यालयाचे प्राचार्य ए बी आढाव, आदींनी विविध सूचना केल्या.
सुत्रसंचालन पो .कॉ.संजय जाधव यांनी केले तर आभार पो. नि. शिळीमकर यांनी मानले. यावेळी ऍड. बी.जी. वैद्य, रोटरी क्लब चे अध्यक्ष अमोल वैद्य,  सुभाष खरबस, आदीसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.