Breaking News

अभिनवमध्ये ‘गणेश फेस्टीव्हल’

अकोले, दि. 02, सप्टेंबर - अभिनव शिक्षण संस्थेमध्ये सालाबादप्रमाणे यावर्षी देखील गणेश फेस्टिवलचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या फेस्टिवलमध्ये अगदी गणेश चतुर्थीच्या दिवसापासून अत्यंत उत्साहाने विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांत सहभाग नोंदविला. अभिनव शिक्षण संस्थेच्या अकोलेसह राजूर, कोतूळ येथील स्कूल्समध्ये देखील हा फेस्टिवल उत्साहात साजरा करण्यात आला.
कोतूळच्या गणरायाची आरती लिज्जत ग्रुपचे कार्यकारी संचालक तथा अभिनव शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश कोते यांच्या हस्ते झाली. गणेशोत्सवामध्ये प्रामुख्याने के.जी. ते पी.जी. च्या विद्यार्थ्यांसाठी  चित्रकला स्पर्धा, कोलाज मेकिंग, नृत्य स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, मोदक स्पर्धा तसेच होस्टेल मधील आदिवाशी मुलांचा सहभाग असलेली लोककला गायन स्पर्धा व विविध गुणदर्शन असलेला सांस्कृतिक कार्यक्रम अशा वैविध्यपूर्ण उपक्रमांत व मंगलमय वातावरणात अभिनव मधील फेस्टिवल साजरा झाला.
पालकांसाठी मोदक बनविण्याच्या स्पर्धा, फुगडी स्पर्धा व पालकांच्या उत्साहाने मिळालेला सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. सातव्या दिवशी गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. यावेळी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे कोषाध्यक्ष भाऊसाहेब नाईकवाडी अध्यक्षस्थानी होते. तर संस्थेच्या कॅम्पस डायरेक्टर प्रा. जयश्री देशमुख, मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अल्फोन्सा डी, प्राचार्या अपर्णा श्रीवास्तव, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य लक्ष्मीकांत आहेर, प्रा. किरण गोंटे, प्रा. अनिल बेंद्रे, प्राचार्य संजय बढे, प्रा. पांडुरंग गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गणेश मूर्ती समोर विद्यार्थ्यांनी संमोहित करणारे गणेश स्तवन करणारे नृत्यप्रकार सादर केले. विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत प्राचार्या अपर्णा श्रीवास्तव यांनी केले.  या महोत्सवा दरम्यान आयोजित केलेल्या विविध उपक्रमाची माहिती प्राचार्या अल्फोन्सा डी यांनी दिली. भाऊसाहेब नाईकवाडी यांनी आपल्या मनोगतामध्ये गणेशोत्सवाचे महत्व विशद केले.