Breaking News

आ. थोरातांची गुजरात विधानसभा निवडणूक काँग्रेस छाननी समितीवर वर्णी

संगमनेर, दि. 02, सप्टेंबर - आगामी गुजरात विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस छाननी समितीच्या अध्यक्षपदी मोठा जनाधार असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली आहे.
आमागी गुजरातसह विविध राज्यांच्या होणार्‍या विधानसभा निवडणूका ह्या देशाच्या राजकारणाला कलाटनी देणार्‍या आहे. गुजरातची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची असून काँग्रेसच्या केंद्रीय समितीने गुजरात विधानसभा काँग्रेस छाननी समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांची निवड केली आहे.
आ. थोरात यांच्या कामाचा आवाका मोठा आहे. गोर-गरिब व  सर्व सामान्य नागरिक, कार्यकर्ते युवक यांच्याबरोबर थेट संबध आणि राज्याच्या विविध विभागांतील प्रश्‍नांचा अभ्यास, यामुळे त्यांचे नेतृत्व लोकप्रिय ठरले आहे. राज्यमंत्री मंडळात कृषी, शालेय शिक्षण, पाटबंधारे, खार जमीन, जलसंधारण, रोहियो, राजशिष्टाचार व महसूल या विभागांमधून उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे. यामुळे उभ्या महाराष्ट्रात त्यांचा आदर केला जातो. स्वच्छ व कार्यक्षम प्रतिमा असलेल्या आमदार बाळासाहेब थोरातांवर मागील निवडणूकांमध्ये पक्षाने प्रचाराची मोठी जबाबदारी दिली होती. ती यशस्वीपणे पार पाडतांना आ. बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळवून दिले. काँग्रेसपक्षाशी एकनिष्ठता, सेवाभावीवृत्ती, कामाची तत्परता, लोकाभिमूखता व सामान्य नागरिकांशी थेट संवाद यामुळे येत्या गुजरात विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीयस्तरावरील गुजरातच्या विधानसभा निवडणूकीची महत्वाची जबाबदारी आ. थोरात यांचेकडे देण्यात आली आहे.   आमदार थोरात यांच्या निवडीचे विविध स्तरातून स्वागत होत आहे.