Breaking News

रवींद्र जाडेजा बाहेरच

मुंबई, दि. 25, सप्टेंबर - टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा पुन्हा एकदा टीममधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे माघार घेतलेला डावखुरा फिरकीपटू  अक्षर पटेल ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन वन डे सामन्यांसाठी टीम इंडियात परतला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधले अखेरचे दोन वन डे सामने  अनुक्रमे बंगळुरू (28 सप्टेंबर)  आणि नागपूरमध्ये (1 ऑक्टोबर) खेळवण्यात येणार आहेत. या दोन्ही सामन्यांसाठीच्या पंधरासदस्यीय भारतीय संघात अक्षर  पटेलची निवड करण्यात आली आहे.
चेन्नईच्या पहिल्या वन डेच्या आदल्या दिवशी फुटबॉल खेळताना त्याचा डावा घोटा दुखावला होता. त्यामुळं अक्षरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन वन डे  सामन्यांतून माघार घ्यावी लागली होती. त्याच्याऐवजी भारतीय संघात समावेश करण्यात आलेल्या रवींद्र जाडेजाला पुन्हा विश्रांती देण्यात आली आहे.