Breaking News

नागपुरात शस्त्रसाठा जप्त; मध्य प्रदेशातील तरुणाला अटक

नागपूर, दि. 27, सप्टेंबर - गांजा तस्करीचा भांडाफोड केल्यानंतर नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका तरुणाला शस्त्रांसह अटक केली आहे. इमाम खान  अब्दुल रहीम (29) असे या तरुणाचे नाव आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तीन पिस्तुले, एक देशी कट्टा, एक एअर गण, एक मॅगझिन आणि 5 जीवंत काडतुसे जप्त  केलीत. या संदर्भात मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, आरोपी इमाम खान हा नागपुरातील बेसा परिसरातील ग्रीन सीटी इथल्या एमरॉन विंग-3 या इमारतीमधील  फ्लॅटमध्ये भाड्याने राहतो. इमाम खान 25 सप्टेंबर रोजी शहरातील हुडकेश्‍वर भागातील व्यंकटेश सिटी परिसरात संशयास्पदरित्या फिरताना आढळला. त्याला  ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडून भारतीय बनावटीची 3 पिस्तुले, एक देशी कट्टा, एक मॅगझीन आणि 5 जीवंत काडतुसे आढळून आलीत. या पूर्वी  चंद्रपूर पोलिसांनी त्याला दारू तस्करी प्रकरणी अटक केली होती. तसेच त्याच्याकडून मारुती स्विफ्ट ही कारही जप्त करण्यात आली होती. दरम्यान तो केवळ तस्कर  आहे की, त्याचा कुठल्या संघटनेशी संबंध आहे का, हे तपासण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक मध्य प्रदेशला रवाना झाले आहे.