Breaking News

हनीप्रीतच्या पतीचा राम रहीम आणि हनीप्रीत विषयी मोठा आरोप

नवी दिल्ली, दि. 23, सप्टेंबर - बलात्काराच्या आरोपाखाली बाबा राम रहीमला राम रहीमला अटक झाल्यानंतर हनीप्रीत फरार आहे. त्यामुळे यावरुन उलट-सुलट  चर्चा सुरू आहेत. तसंच राम रहीम आणि हनीप्रीतमधलं नेमकं नातं काय? असा प्रश्‍नही संपूर्ण देशाला उद्भवतो आहे. याच प्रश्‍नाची उत्तरं देण्यासाठी हनीप्रीतचा पहिला  पती विश्‍वास गुप्ता प्रसारमाध्यमांसमोर आला होता. यावेळी त्यानं बाबा राम रहीमच्या कृत्याची पोलखोल केली.
स्वतःची कैफीयत मांडताना विश्‍वास गुप्ताला रडू कोसळलं. यावेळी त्यांने हनीप्रीत आणि राम रहीमचे अनैतिक संबंध असल्याचा आरोपही यावेळी केला. हनीप्रीत आणि  बाबा राम रहीमच्या संबंधा बद्दल सांगताना विश्‍वास गुप्ता म्हणाला की, बाबा राम रहिमने सुरुवातीला हनीप्रीत आपली मुलगी असल्याचा बनाव करत होता. पण  दोघांमध्ये 13 वर्षांचं अंतर होतं. या दोघांमध्ये बाप आणि मुलगीचं अंतर अजिबात नव्हतं.