Breaking News

महिला नगरसेविका गुजरातच्या दौर्‍यावर रवाना

औरंगाबाद, दि. 14, सप्टेंबर - महिला बालकल्याण विभागाच्या वतीने पालिका सभागृहातील महिला सदस्यांसाठी दिवसांच्या गुजरात दौर्‍याचे आयोजन करण्यात  आले होते. या दौर्‍यासाठी 28 महिला सदस्या मंगळवारी सायंकाळी गुजरातकडे रवाना झाल्या. स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल, महिला बाल कल्याण  समितीच्या सभापती आशा भालेराव, माजी सभापती अर्चना नीळकंठ, स्वाती नागरे, उपायुक्त रवींद्र निकम, विधी सल्लागार अपर्णा थेटे-शेडमकर या वेळी उपस्थित  होते. सात दिवसांच्या या दौर्‍यात महिला सदस्या, सुरत, साबरमतीसह अन्य शहरांना भेट देणार असून तेथील पालिकेत महिलांसाठी कोणते उपक्रम राबवले जातात,  त्याचे काय परिणाम समोर आले, याचा ते अभ्यास करणार आहेत.