Breaking News

शिक्षण स्वावलंबन शिकविणारे असावे - नंदा जिचकार

नागपूर, दि. 14, सप्टेंबर - महापौर झाल्यापासून रोज अनेक लोक नोकरीसंबंधी विचारतात. उच्च शिक्षित विद्यार्थी देखील शिपाई अथवा बस कंडक्टर बनण्यास  तयार असतात. त्यांच्यात काय कौशल्ये आहेत, असे विचारता ते निरुत्तर होतात. यावरुन आजच्या शिक्षणाचा दर्जा कळतो. त्यामुळे शिक्षण केवळ पदवी  मिळविण्यापुरते नसावे, तर ते स्वावलंबन शिकविणारे असावे, असे प्रतिपादन नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी केले. 
भारतीय शिक्षण मंडळद्वारे ‘शिक्षणसमीक्षा’ द्वैमासिकाचे प्रकाशन बुधवार, 13 सप्टेंबर रोजी हिंदू धर्म संस्कृती मंदिर, धंतोली येथे महापौरांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर मनपा शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, शिक्षणतज्ज्ञ व शिक्षणसमीक्षाचे माजी प्रधान संपादक बाबासाहेब नंदनपवार, मुख्य  संपादक श्री.म. पांडे, भारतीय शिक्षण मंडळचे अखिल भारतीय संघटनमंत्री मुकुल कानिटकर उपस्थित होते. आतापर्यंत बाबासाहेब नंदनपवार यांनी या मासिकाचे  प्रधान संपादकत्व भूषविले होते. बाबासाहेब नंदनपवार यांनी आपल्या शिक्षण घडविणे हा शिक्षणसमीक्षा द्वैमासिकाचा उद्देश असून भारतीय शिक्षण मंडळाकडून या  उद्देशाची पुर्तता व्हावी, अशी अपेक्षा केली.