Breaking News

जनतेचा टीमवर्क पोलिसांबरोबर असल्यास कायदा सुव्यवस्था अबाधित राहणार - जिल्हाधिकारी महाजन

अहमदनगर, दि. 26, सप्टेंबर - सामाजिक बांधिलकी जपण्यास खेळ हा उत्तम पर्याय आहे. खेळ खेळताना माणुसपण जागृत होवून, खेळाडूवृत्ती वाढते. टीमवर्कने  सामना जिंकता येतो. एकट्या माणसाला जे शक्य नसते, ते टीमवर्कने शक्य होते. सर्व जनतेचा टीमवर्क पोलिसांबरोबर असल्यास कायदा सुव्यवस्था अबाधित राहील  असे प्रतिपादन  जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी केले.
जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर जातीय सलोखा उपक्रमातंर्गत पोलिस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा पोलिस क्रिकेट चषकाच्या बक्षिस  वितरणप्रसंगी जिल्हाधिकारी महाजन बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी विश्‍वजित माने, जिल्हा पोलिस अधिक्षक  रंजनकुमार शर्मा, सहा.पोलिस अधिक्षक डॉ.अक्षय शिंदे, प्र.पोलिस उप अधिक्षक नारायण वाखारे, पोलिस उप अधिक्षक (ग्रामीण) आनंद भोईटे आदि उपस्थित होते.