Breaking News

शिवछत्रपती गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीरात 42 जणांचे रक्तदान

बुलडाणा, दि. 01, सप्टेंबर - देऊळगाव मही येथे गणेश उत्सव साजरी करत असताना या वर्षी मात्र मोठ्या प्रमाणात गावात विविध प्रकारे समाज उपयोगी व समाज  प्रबोधन कार्यक्रम घेतल्या जात आहे. त्यातीलच एक भाग म्हणून शिवछत्रपती गणेश मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये 42 युवकानी  रक्तदान करत रक्तदान याही श्रेष्ठ दान म्हणत शिबिरात सहभाग नोंदवला. 
सन उत्सव साजरा करतच आपण समाजासाठीही खूप काही करू शकतो हे या उपक्रमातून शिवछत्रपती मंडळाने दाखवून दिले आहे. राहिलेले दिवस आम्ही असेच  गाव व समाज हिताचे उपक्रम राबणार आहोत व पुढे ही राबवू असे मंडळ सदस्यांनी मत व्यक्त केले. यासाठी बळी राम शिंगणे, अनिरुद्ध शिंगणे, निखिल शिंगणे,  भागवत शिंगणे, नागेश शिंगणे व इतर मंडळातील सदस्यांनी परिश्रम घेतले.