Breaking News

कांदा व्यापार्‍याची 54 लाखांची फसवणूक

सोलापूर, दि. 24, सप्टेंबर - सोलापूर -मार्केटयार्डमधील कांदा व्यापार्‍याकडून केरळ येथील व्यापार्‍यांनी 54 लाखांचा कांदा घेऊन पैसे दिले नसल्याने  फसवणुकीचा गुन्हा जेलरोड पोलिसात दाखल करण्यात आला आहे.म. युसूफ अ. गफूर बागवान (वय 39, रा. तेलंगी पाच्छा पेठ, जिजामाता हॉस्पिटलजवळ) यांनी  फिर्याद दिली आहे. मार्रर कंपनीचे संचालक जयेश गोपीनाथ आणि सैजु पी.के. यांनी 54,91,736 रुपयांचा कांदा विकत घेतला. वारंवार मागून सुद्धा पैसे दिल्याने  बागवान यांनी जेलरोड पोलिसात फिर्याद दिली. ही घटना मार्च ते 20 मार्च 2017 या दरम्यान घडली.मार्केट यार्ड मधील व्यापारी परराज्यातील व्यापार्‍यासोबत  व्यवसाय करतात. दररोज लाखो रुपयांचा व्यवसाय केला जातो. या व्यवसायामध्ये प्रथम सर्व व्यवहार सुरळीत होतो. नंतर नंतर फोनवरून व्यवहार होतो. कांद्याच्या  व्यवहारातच फसवणूक होत असते. फोन वरून कांदा मागवला जातो. नंतर त्याचे पैसे दिले जात नाही. अशा परिस्थितीत पहिल्याचवेळी जेव्हा कांद्याचे पैसे मिळत  नसतानाही सोलापूरचे व्यापारी पुन्हा त्यांना उधारीवर कांदा देतात. असा प्रकार होऊन नंतर त्यांची मोठी फसवणूक होते.