Breaking News

उजनी 100 टक्के तर 24 लघु प्रकल्प कोरडेच, पावसाची अद्याप प्रतीक्षा

सोलापूर, दि. 24, सप्टेंबर - पावसाळा संपत आला असला तरी अद्याप जिल्ह्यात मध्यम लघुप्रकल्पांमध्ये म्हणावा तेवढा पाणीसाठा झाला नाही. सात मध्यम  प्रकल्पामध्ये 52 टक्के पाणीसाठा झाला असून, हिंगणी ढाळे पिंपळगाव हे दोन मध्यम प्रकल्प तर 17 लघुप्रकल्प 100 टक्के भरले आहेत.विशेष म्हणजे बार्शी  तालुक्यातील 12 पैकी 11 लघुप्रकल्प 100 टक्के भरलेली आहेत. बार्शी तालुक्यात एकूण सरासरीच्या 136 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात 22 सप्टेंबरअखेर  390 मि.मी. पाऊस झाला.मध्यम लघु प्रकल्प म्हणावे तसे भरलेले नाहीत. उजनी धरण 100 टक्के झाल्यानंतर शेतीचा पाण्याचा प्रश्‍न मिटला असला तरी अद्याप  जिल्ह्यातील मध्यम लघु प्रकल्प भरलेले नाहीत. अक्कलकोट तालुक्यातील बोरी उत्तर सोलापूर तालुक्यातील एकरूख हे दोन्ही मध्यम प्रकल्प 25 टक्केच्या आतच  आहेत तर 53 पैकी फक्त 17 लघु प्रकल्पांमध्ये 100 टक्के पाणीसाठा झाला आहे, उर्वरित 12 प्रकल्पांमध्ये 50 ते 70 टक्के पाणीसाठा आहे. 24 लघुप्रकल्पांमध्ये  म्हणावा तसा पाणीसाठा झाल्याची स्थिती नाही.जिल्ह्यातसात मध्यम प्रकल्पांमध्ये सरासरी 52 टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये एकरूख 22.33, हिंगणी 105,  जवळगाव 51, मांगी 36.88, आष्टी 83.18, बोरी 24.04, ढाळे पिंपळगाव 100 टक्के इतकी टक्केवारी आहे. मोहोळ तालुक्यातील आष्टी अक्कलकोट तालुक्यातील  बोरी, उत्तर सोलापूर तालुक्यातील एकरूख या मध्यम प्रकल्पात म्हणावे तेवढे पाणी आले नाही.एकूण 53 लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत. पैकी 17 प्रकल्प 100 टक्के  भरले. 50.37 दलघमी पाणीसाठा उआहे. यामध्ये उत्तर सोलापूर - बीबी दारफळ, बार्शी - पाथरी, कोरेगाव, गोरमाळे, कारी, वालवड, काटेगाव, तावडी, ममदापूर,  वैराग, चारे, कळंबवाडी, करमाळा - पारेवाडी, म्हसेवाडी, राजुरी, कुंभेज सांगोला तालुक्यातील अचकदाणी प्रकल्पांचा समावेश आहे .