Breaking News

महाराष्ट्रातील 3 महिलांना भारतीय महिला सबलीकरण पुरस्कार प्रदान

सातारा, दि. 03, सप्टेंबर - महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याच्या सुनिता कांबळे, उस्मानाबादच्या कमल कुंभार आणि नागपूरच्या हरशिनी कन्हेकर यांना 29 ऑगस्ट  2017 रोजी भारतीय महिला सबलीकरण 2017 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संयुक्त राष्ट्रसंघ, माझे सरकार आणि निती आयोगाच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथील हॅबिटेट सेंटरच्या जॅक्यारंडा सभागृहात वूमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इरानी, संयुक्त राष्ट्र संघाचे भारताचे प्रमुख युरी अफान्सिव, निती आयोगाचे  उपाध्यक्ष डॉ. अरविंद पनगरीया, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर पूजा ठाकूर या उपस्थित होत्या.
यावेळी देशभरातील विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-या 12 महिलांना पुरस्कृत करण्यात आले. यापैकी 3 सर्वाधिक महिला या महाराष्ट्राच्या आहेत. पुरस्काराचे  स्वरुप स्मृती चिन्ह तसेच प्रमाणपत्र असे आहे. या पुरस्कारासाठी देशभरातून 3000 अर्ज आलेले होते.
माणदेशी फौंडेशन, म्हसवड या संस्थेत शेळी डॉक्टर म्हणून कार्यरत असणा-या सुनिता कांबळे यांना देशातील पहिल्या महिला शेळी डॉक्टर म्हणून सन्मानित  करण्यात आले. त्यांनी माणदेशी फौंडेशनतर्फे प्रशिक्षण घेतले. त्यातून त्यांनी शेळी समुहाची सुरुवात केली. आज त्यांची प्रेरणा घेऊन 13 महिला शेळी डॉक्टर निर्माण  झाल्या आहेत. सुरुवातीच्या काळात विरोध असणार्या लोकांकडून आज सन्मानाची वागणूक मिळत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. त्यांना केंद्रीय मंत्री  इरानी यांच्या हस्ते गौरविण्यात आल्याबद्दल हा तुमच्या पासून सुरु होतो आणि हे या 12 महिलांनी सिध्द करुन दाखविलेले आहे असे कौतुकोद्गार स्मृती इरानी यांनी  पुरस्कार दरम्यान काढले.
चेतना सिन्हा (अध्यक्षा, माणदेशी महिला सह. बँक व माणदेशी फौंडेशन म्हसवड), जवाहर देशमाने (उपाध्यक्ष, माणदेशी
फौंडेशन म्हसवड,) ललिता पोळ (उपाध्यक्षा - माणदेशी महिला सह. बँक), रेखा कुलकर्णी (व्यवस्थापकीय विश्‍वस्त - माणदेशी फौंडेशन म्हसवड), विजय सिन्हा  आणि वनिता शिंदे माणदेशी बँक व माणदेशी फौंडेशन कर्मचारी वर्ग यांनी सौ. सुनिता कांबळे यांचे अभिनंदन केले.