Breaking News

24 सप्टेंबर रोजी ठाणे - कल्याण, नेरूळ -पनवेल मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई, दि. 23, सप्टेंबर - येत्या रविवारी ठाणे ते कल्याण डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.20 पासून दुपारी 4.20 पर्यंत मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.  तर नेरूळ ते पनवेल मार्गावरील गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कालावधीत सकाळी 10.48 पासून दुपारी 4.23 पर्यंत मुलुंड स्थानकावरून सुटणा-या  धीम्या गाड्या कल्याण स्थानकापर्यंत डाऊन जलद मार्गावर चालवल्या जाणार आहेत. यामध्ये गाड्या ठाणे, दिवा व डोंबिवली या स्थानकांवर थांबतील. यामुळे  गाड्या सरासरी 10 मिनिटे उशिराने अंतिम स्थानकावर पोचतील, असे रेल्वे प्रशासनाकडून आज सूचित करण्यात आले.
डाऊन धीम्या मार्गावरील कळवा, मुंब्रा, कोपर व ठाकुर्ली या स्थानकांवर गाड्या थांबणार नाहीत. सकाळी 10.20 पासून दुपारी 2.42 पर्यंत छत्रपती शिवाजी  महाराज टर्मिनस स्थानकावरून सुटणा-या सर्व डाऊन जलद गाड्या नियमित थांब्याशिवाय घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा या स्थानकांवर अतिरिक्त  थांबतील. यामुळे गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने अंतिम स्थानकावर पोचतील.
या बरोबरच नेरूळ ते पनवेल दरम्यान अप व डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी 11.20 ते दुपारी 4.15 पर्यंत पनवेल / बेलापूर येथून छत्रपती शिवाजी महाराज  टर्मिनसकडे जाणा-या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. सकाळी 11.04 पासून दुपारी 3.53 पर्यंत पनवेल / बेलापूर येथून ठाण्याकडे जाणा-या, तसेच सकाळी  11.42 पासून दुपारी 4.04 पर्यंत नेरूळ येथून पनवेल / बेलापूरकडे जाणा-या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मेगाब्लॉकच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज  टर्मिनस ते नेरूळ व ठाणे ते नेरूळ या मार्गांवर विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.