Breaking News

यावलला देशी दारूच्या बाटल्यांचे 21 खोके जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

जळगाव, दि. 30, सप्टेंबर -  यावल येथील साने गुरूजी शाळेच्या पाठीमागील पाण्याच्या टाकीजवळ मुक्ताईनगरच्या उपविभागीय उत्पादन शुल्क विभागाने देशी  दारुच्या बाटल्यांचे 21 खोके जप्त केले. या मुद्देमालाची किंमत 55 हजार 440 रुपये आहे. बुधवारी ही कारवाई झाली. निरीक्षक बी. बी. जगताप, बी. व्ही. जाधव,  एस. एम. मोरे, व्ही. व्ही. गावंडे यांनी कारवाई ही केली आहे.