Breaking News

जीएसटी विवरण पत्र सादर करण्यास 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

हैदराबाद, दि. 10, सप्टेंबर - वस्तू व सेवा कर प्रणालीतील विवरण पत्र सादर करण्यास 10 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. वस्तू व सेवा कर परिषदेची  21 वी आज बैठक केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या आधी 10 सप्टेंबरपर्यंतची मुदत होती.
या बैठकीत आलिशान व मध्यम आकाराच्या गाड्यांवरील वस्तू व सेवा उपकरात वाढ करण्यात आली. एसयुव्ही श्रेणीतील गाडीवर 7 टक्के, आलिशान गाड्यांवर 5  टक्के, मध्यम आकाराच्या गाड्यांवर 4 टक्के, छोट्या गाड्यांवर 2 टक्के ॠसेस’ वाढवण्यात आला आहे. रेनकोट, रबर बँड आदी 30 वस्तूंवरील करात कपात करण्यात  आल्याचे जेटली यांनी सांगितले. जुलै महिन्यानंतर नोंदणीत वाढ झाली आहे. जुलै महिन्यात नव्या कर प्रणाली अंतर्गत 95 हजार कोटी महसूल जमा झाला. 70  टक्के नोंदणीकृत करदात्यांनी विवरण पत्र सादर केले असल्याचे जेटली यांनी सांगितले.