Breaking News

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा शुभारंभ

बुलडाणा, दि. 21 - जिल्ह्यातील घिर्णी ता.मलकापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलांना जि.प.अध्यक्षा उमाताई तायडे तसेच उपाध्यक्षा मंगलाताई रायपुरे यांच्याहस्ते बालकांना जंतनाशक मोहिमेचा शुभारंभा 18 ऑगस्ट रोजी करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेची सविस्तर माहिती देवुन 6 ते 19 वर्ष वयोगटातील शाळेत जाणारे व शाळेत न जाणारे विद्यार्थ्यांना तसेच 1 ते 6 वयोगटातीला सर्व बालकांना जंतनाशक गोळी देण्यात येणार असल्याची माहिती दिली. यावेळी घिर्णी गावच्या महिला सरपंच मुक्ताबाई वनारे, जिल्हा माता संगोपन अधिकारी डॉ.आर.डी. गोफणे, गटविकास अधिकारी तायडे, सहाय्यक गटविकास अधिकारी डॉ. चव्हाण, मलकापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ.उमेश सावजी, डॉ.लवंगे व नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य कर्मचारी आर.पी. लोखंडे, जि.प.शाळेचे मुख्याध्यापक पाटील, शिक्षक व शाळेतील विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, गावकरी मंडळी, धिरज फिरके, श्रीमती पाटील, श्रीमती कोळी, खडसे आदिंनी परिश्रम घेतले.