लागवड अधिकारी मन्सुरी यांच्यावर कारवाईसाठी हनिफ खान बिलन खान यांचे आमरण उपोषण!
बुलडाणा, दि. 21 - सामाजिक वनिकरण परिक्षेत्र कार्यालय चिखली येथील लागवड अधिकारी मन्सुरी यांनी सन 2012-13 पासून ते आजपर्यंत शासनाचा निधी खर्च करुन प्रत्यक्षात न केलेल्या कामाची सखोल खाते चौकशी करुन संबंधित प्रकरणामध्ये समाविष्ठ असलेले अधिकारी,कर्मचारी यांनी बनावट कामे दाखवून कागदोपत्री पाठबळ दिले आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचार यांनी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे तसेच निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी हनिफ खान बिलन खान रा.कोथळी ता.मोताळा यांनी दि.14 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सामाजिक वनिकरण परिक्षेत्र कार्यालय चिखली येथील लागवड अधिकारी मन्सुरी यांनी सन 2012-13 ते आजपर्यंत एकाच कामावर अनेक वेळा कामे दाखवून म.गां.ग्रा.रो.ह.यो. अंतर्गत कामात अनेक कामे न करता शासनाची फसवणूक करुन दिशाभूल केलेली आहे. तसेच बनावट कागदोपत्री सदरचे कामे दाखवून शासनाची फसवणूक केली. याबाबत हनिफ खान बिलन खान यांनी सामाजिक वनिकरण परिक्षेत्र कार्यालय चिखली यांचेकडे दि.28/10/2015 रोजी माहिती अधिकारात रितसर अर्ज देवून कार्यक्षेत्रांतर्गत येत असलेल्या कामांची माहिती मागितली असता प्रकरणात विहित मुदतीत माहिती पुरविण्यात आली नाही.
प्रकरणात तत्कालीन प्रथम अपिलीय अधिकारी तथा उपसंचालक, सामाजिक वनिकरण बुलडाणा यांच्याकडे दि.07/12/2015 रोजी माहिती धिकारातील प्रथम अपील दाखल केले. अपिलाची दखल घेवून पत्र क्र.18/15 मध्ये दि.18/12/2015 रोजी सुनावणी घेण्यात आली. सदर प्रकरणात माहिती पुरविण्याचे आदेश करण्यात आले होते. लागवड अधिकारी मन्सुरी यांनी चुकीची माहिती देवून सदर माहितीमध्ये खोडतोड करुन तसेच टाचपीन लावून अर्धवट काढलेल्या झेरॉक्स प्रकारची माहिती दिली. सदर माहितीचे अवलोकन केले असता सदरची माहिती ही बनावट व खोटी स्वरुपाची आहे. म्हणून लागवड अधिकारी मन्सुरी यांनी शासनाची दिशाभूल करुन फसवणूक केल्याप्रकरणी योग्य कारवाईसह फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जावी.
तसेच त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी हनिफ खान बिलन खान यांनी 14 ऑगस्टपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. परंतु सदर उपोषणाची दखल प्रशासनाने व पालकमंत्री यांनी घेतली नाही, ही गंभीर बाब असून भ्रष्टाचार करणार्यास एकप्रकारे प्रशासनाचे पाठबळ असल्याचे यामुळे दिसून येत आहे.