पोळा सणानिमित्त राजस्थानी कलाकारांनी बनवलेली आकर्षक बैलजोडी बाजारात उपलब्ध
बुलडाणा, दि. 21 - बैलपोळा हा सण श्रावण आमवस्या किंवा भाद्रपद आमवस्या या तिथीला साजरा करण्यात येतो. हा सण यंदा सोमवारी आल्याने बुलडाणा येथील आठवडी बाजारात पहिल्यांदाच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या राजस्थानी कलाकारांनी बनविलेल्या 30 किलो वजनाच्या बैलजोड्या सर्वांचे लक्ष आकर्षित करीत आहेत.
बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा अस्सल मराठी सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पुजा करतात. मराठमोळ्या शेतकर्यांच्या या सणाचे विशेष महत्व असते. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. ग्रामीण भागात तर “आला पोळा आणि पाऊस झाला भोळा’’ या अर्थाची म्हण प्रचलित आहे. पोळ्याच्या आगोदरच्या दिवशी बैलांना आमंत्रण दिले जाते. त्यांना नदीवर, ओढ्यात किंवा पाणी मिळोल तेथे नेवून स्वच्छ धुतल्या जाते. नंतर चारुन घरी आणल्या जाते. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद, तुप आणि तेलाने मालिश करतात. दुसर्या दिवशी बैलांच्या सर्वांगावर गेरुची ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगराच्या माळा, नवी वेसन, नवा कासरा, करदोड्याचे तोडे घालतात आणि दुपारी चार वाजता सजवून-नटवून गावाच्या वेशीत आणले जाते. सर्व गावातील बैल एकत्र आल्यावर गावाच्या वेशीला पाटलाच्या हाताने आंब्याच्या झाडाची पाने बांधलेली तोरण बांधल्या जाते. वाद्याच्या निनादात पाटलाच्या हस्ते तोरण तोडल्या जाते. पोळा फुटतो नंतर सर्व शेतकरी आपले बैल मारुतीच्या मंदीरावर नेवून त्यांना ओवाळतात नंतर आपआपल्या घरी नेवून त्यांना पुरण पोळी खावू घालतात. सर्व गावातून मिरवूण आणतात. अशाप्रकारचे महत्व या सणाला आहे. म्हणून बुलडाण्यातील नामवंत सुप्रसिद्ध कारागिर, मातीभांडी विक्रेत मनोज बेदरकर यांच्या गोराबा मार्गाच्या पाटीजवळील दुकानात आकर्षक , सर्वांचे लक्ष वेधून घेणारी 30 किलो वजनाची बैलजोडी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे. याची किंमत सुमारे अडीच हजारांपासून चार हजार रुपयांपर्यंतच्या बैेलजोड्या या मूर्तीकाराकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.