माकपच्या मुख्यालयातील इंटरनेट सेवेत बिघाड; येचुरींची केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार
नवी दिल्ली, दि. 21, ऑगस्ट - येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मुख्यालयात इंटरनेट सेवेत बिघाड झाल्याची तक्रार पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी थेट केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.
11 ऑगस्टपासून गोपालन भवनमधील माकपच्या मुख्यालयात इंटरनेट सेवेत अडचणी येत आहेत. त्यामुळे येथील कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. या संदर्भात महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या अधिका-यांकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. संबंधित अधिका-यांकडून कोणतेच उत्तर न आल्याने केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहावे लागले असल्याचेही येचुरी यांनी म्हटले आहे.