Breaking News

उत्कल एक्स्प्रेस अपघात : मृतांची संख्या 23, मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

नवी दिल्ली, दि. 21, ऑगस्ट - मुजफ्फरनगर (उ.प्र.) येथे त्कल एक्स्प्रेसला झालेल्या अपघातातील 14 डबे रूळावरून घसरले. यात मृतांची संख्या 23  तर जखमींचा आकडा 100 वर पोचला आहे. या अपघातानंतर ओडिशा व उत्तर प्रदेश सरकारबरोबरच रेल्वे मंत्रालयाकडूनही आर्थिक मदतीची घोषणा  करण्यात आली आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची घोषणा केली आहे. रेल्वे मंत्रालयाने मृतांच्या नातेवाईकांना साडे तीन  लाख रुपये व गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये व किरकोळ जखमींना 25 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी  आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये व जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. अपघाताचे वृत्त समजताच पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनीही तीव्र दु:ख व्यक्त केले. जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे होवोत, अशी प्रार्थना केली. रेल्वे मंत्रालयाकडून परिस्थितीकडे बारकाईने लक्ष  ठेवले जात आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केले आहे.