Breaking News

ड्रोन आढळल्याने दिल्ली विमानतळावरील वाहतूक तात्पुरती बंद

नवी दिल्ली, दि. 21, ऑगस्ट - दिल्ली इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात वैमानिकाला ड्रोन आढळल्याने विमानांची वाहतूक तात्पुरता थांबवण्यात  आली आहे. यामुळे विमानतळावरील तिन्ही धावपट्ट्या बंद करण्यात आल्या आहेत. दिल्लीला येणा-या विमानांचा मार्ग बदलण्यात आला आहे. ड्रोन बाबतची  माहिती नेमक्या कोणत्या विमान कंपनीच्या वैमानिकाने दिली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र, त्याने ड्रोन पाहताच तात्काळ हवाई  वाहतूक नियंत्रण कक्षास याबाबतची माहिती दिली. त्यानंतर धावपट्टी बंद करण्याच्या सूचना नियंत्रण कक्षाकडून देण्यात आल्या.