Breaking News

संगमनेरातील रहिमपूरमध्ये उज्वला गॅसचे वाटप पद्मश्री विखेंचा वारसा पुढेही सुरूच राहणार-ना. सौ. विखे

संगमनेर दि. 29 (प्रतिनिधी):- पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी लोक कल्याणाची कामे करण्याचा जो आदर्श घालून दिला आहे, त्यानुसार विखे कुटूंबाकडून विकास कामे करताना गटा-तटाचे व जाती-पातीचे राजकारण केले जात नाही. केंद्र व राज्य शासनाची प्रत्येक योजना हि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे प्रमाणिक काम सुरू असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ना. सौ. शालिनीताई विखे पा. यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथे पंतप्रधान उज्वला योजनेतील लाभार्थी महिलांना गॅस वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी बाजीराव शिंदे होते. याप्रसंगी प.स. सदस्य निवृत्ती सांगळे, अ‍ॅड. बापुसाहेब गुळवे, गोकुळ दिघे, दिलीप इंगळे, अंकुश कांगणे, रघुनाथ शिंदे, ज्ञानेश्‍वर वर्पे, गणपत शिंदे, अशोक गुळवे, ग्रा.प. सदस्या श्रीमती मोरेंसह महिला उपस्थित होत्या.
 ना. सौ. विखे पा. यांनी ग्रामस्थांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत, गॅसचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेही असल्याने महिलांनी गॅस बाबत पुर्ण माहिती घेवून त्याचा सुरक्षित वापर करावा, व महिला बचत गटासाठी शासन विविध योजनांमार्फत उद्योग उभारण्यासाठी मदत करत असून त्याचा लाभ परिसरातील महिलांनी घ्यावा. समाजकल्याण विभागाच्या विविध योजनाची माहिती देत ना. सौ. विखे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांनी योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळवून देण्यासाठी कागदपत्राची पुतर्ता करत पाठपुरावा करावा, अशा सुचना दिल्या. विखे कुटुंबिय पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कल्याणकारी कार्य करण्याचा वारसा असाच सुरू ठेविल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
दरम्यान गावातील घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थी कुटूंबांना शासकीय जागा, ग्रामपंचायत कार्यालयाला सुसज्ज इमारत, बसण्यासाठी बाकडे व लोकसंख्या वाढीमुळे पिण्याच्या पाण्याची टाकी मिळवी, अशी मागणी रहिमपूर ग्रामस्थांनी ना. सौ. विखेंकडे केली.