Breaking News

महापालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन कागदावरच कचरा सडल्याने नागरिकाचे आरोग्य आले धोक्यात

अहमदनगर, दि. 29 - पावसाळ्यापूर्वी करावयाचे आपत्कालीन व्यवस्थापन कागदावरच राहिले  आहे . नुकत्याच झालेल्या पावसामुळे गटारीत कचरा रस्तावर आला तसेच उकाड्यावर साचलेला कचरा सडल्याने त्याचा उग्र वास सुटला आहे . या दुर्गंधीयुक्त वासाने नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे .
गेल्या आठ दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे गटारात मोठा गाळ साचला आहे . त्यामुळे गटारीत येणारे सांडपाणी रास्ता मिळेल तिकडे वाहत आहे . त्यातच कचरा कुंडीतील कचर्‍याचा वास पाण्यामुळे सुटला आहे अशी परस्थिती अनेक  भागात आहे . या भागात वेवेगळ्या आजारांनी तोड बाहेर काढले आहे आशा भागातील लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले  आहे शहरातील दवाखाने रुग्णाच्या गर्दीने फुल झाली आहेत .यामुळे शहरातील नागरिक मनपाच्या अनागोदी कारभाराला वैतागले आहे. मनपाचे पदाधिकारी नागरिकांच्या विकास प्रश्‍नाकडे लक्ष देण्याऐवजी एकमेकांच्या राजकारणात व भांडणातगुंतल्याचे दिसत आहे  पदाधिकार्‍यांचे लक्ष नसल्याचा  फायदा प्रशासन अधिकारी व कर्मचार्‍यांनी घेतला आहे . त्यामुळे कचरा उचलला जात नाही ’झाडलोट वेळेवर होत नाही .त्यामुळे अनेकठिकाणी कचर्‍याचे ढीग साचले आहे. त्याचाही वास सुटला आहे.
आरोग्यविभागाला विचारणा केल्यानंतर  अधिकारी व कर्मचारी फक्त कागदी घोडे एकमेकासमोर नाचवून  वेळ भागून  नेतात , हे सर्वजण नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे . याना फक्त त्याच्या  पगाराचे पडले आहे . विकास काम करावे यासाठी कर्मचार्‍यांनी कधी आंदोलन मनपाच्या इतिहासात केले नसेल पण पगारासाठी आंदोलन केल्याचं इतिहास मात्र निश्‍चित घडविला असेल, अशी नागरकरमध्ये चर्चा आहे . मनपातर्फे दरवर्षी आपत्कालीन आराखडा तयार केला जातो. नालेसफाई ,धोकादायक इमारती ,तुंबलेली गटारे , आपत्ती व्यवस्थापन कक्ष ,तसेच सक्षम  आरोग्य यंत्रणेबाबत उपाय योजना या आराखड्याद्वारारे केल्या जातात . मात्र पावसाळा  संपत आला तरी या योजना अद्याप कागदावरच आहे त्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.   शहरातील खड्यात साचलेल्या पाण्याची व गटारात व गटाराजवळ साचलेल्या पाण्याची निचरा करणासाठी कोणतीच उपाय योजना करण्यात आलेली नाही याचाही वसाहतीतील नागरिकांना  व वाहन चालकांना होत आहे . अनेक वसाहतीतील रस्ते  पाण्याखाली  गेले आहेत ,वाट लागल्याने  वाट सापडेल तसा रास्ता शोधावा लागत आहे .ओढे ,नाले बुजविल्याने जमिनीतून पाणी उकळ्या मारून रस्ताने वाहताना दिसत आहे . कागदावरील आराखडा प्रत्येक्षात उतरून तातडीने उपाययोजना कराव्यात व नागरिकांच्या जीवाशी खेळणारा खेळ थांबवावा अशी मागणी नागरिकांच्या चर्चेतून  व्यक्त होत आहे . महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा अनेकनागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.