अजिंठा डोंगररांगाचे दरड आणि नांदेड विमानतळाची सुरक्षा भिंत कोसळली,दुपारी पावसामुळे तिघांचा मृत्यू
औरंगाबाद, दि. 21, ऑगस्ट - काल रात्री पासून संपूर्ण मराठवाडयात पावसाच्या संततधारा चालु असून अजिंठा डोंगररांगाचे सोयगाव तालुक्यात येणारे मोठे दरड कोसळले यामुळे वन्यप्राणि भयभीय होवून पळून गेले तर मराठवाडयातील अनेक नदयांना पुर आल्याने बर्याच गावांचा संपर्क तुटला आहे पैठण , नांदेड असे अनेक गावं जलमय झाली आहेत.दुपारपासून दोन दुर्घटनेत तिघाजणांचा मृत्यू झाला आहे.आता पर्यंत सातजणांचा मृत्यू पाण्यात वाहून आणि भिंत कोसळून झाला आहे.
हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे मराठवाडयात काल 19 तारखेपासून पावसाला सुरूवात झाली या मुळे अनेक कोरडया पडलेल्या नदया दुधडी भरून वाहू लागल्या पावसाच्या संततधारांमुळे लातूर तालुक्यातील नागझरी येथील उच्चतम बंधा-याचे दरवाडे उघडले गेले असून निलंगा तालुक्यातील उजेड गावापासून वाहणारी मांजरा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे तर पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील विरभद्रा नदीलाही पूर
आला आहे.नांदेड जिल्हयात अनेक गावांत रस्त्यांवर ओढयांचे पाणी आल्याने त्या गावांचा संपर्क तुटला आहे. हिंगोलीच्या कयाधू नदीलाही पूर आला आहे.या पावसाचा फटका विमानतळालाही बसला असून गुरू गोविंदसिंगजी महाराज विमानतळाची सुरक्षा भिंत पावसामुळे कोसळली असून तेथे सफाई चालु आहे. नांदेड येथे तानाजी ऊर्फ शुभम शिंदे (12 ) याचा नाल्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला तो मित्रासोबत पाणी बघावयास गेला असताना ही दुर्घटना घडली.तर औरंगाबाद शहरातही या पावसाने दाणाण उडवली असून शहरात अनेक ठिकाणी पाणी साठले आहे.तर वाळूज या उपनगरात रांजणगाव शेनपुंजी येथे घरात झोका खेळताना अंगावर भिंत पडून मुंजाजी गाडगीळ व रमा गाडगीळ या दोन भावंडांचा मृत्यू झाला.
सोयगाव वनक्षेत्राला लागून असलेल्या अजिंठा डोंगररांगांत पावसाचा जोर कायम होता. संततधार पावसात डोंगराच्या निंबायती ता. सोयगाव भागात आणि सोयगाव शिवारातील चिंचखोरी शिवारात दोनवेळा अजिंठा पर्वतरांगाच्या दरडी कोसळल्या.या मुळे वन्यप्राणी भयभीत होवून या परिसरातील शेतात शिरले.मोर ,हरिण या बरोबरच काहि हिंसक प्राणीही असल्याने भयभीत झालेल्या शेतकर्यांनी शेतात न जाणेच पसंत केले.वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळाची पाहणी करत आहेत.काल यात्री पासून आज दुपारपर्यंत पाण्यात वाहून आणि भिंत पडल्याने सातजण मरण पावले आहेत.यातील दोन मुली व एक महिला परभणी जिल्हयातील आहेत.