Breaking News

जायकवाडीच्या पाणीसाठयात वाढ

औरंगाबाद, दि. 21, ऑगस्ट - नाशिक जिल्हयातील दारण, गंगापूर धरणातून विसर्ग होत असल्याने ते पाणी मराठवाडयात येत असल्याने जायकवाडी  धरणाच्या पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत असून आज 8 तासात धरणातील पाणीसाठा 2 टक्क्याने वाढला आहे. एवढया जलगतीने जलसाठा वाढल्याचा  अनुभव पहिल्यांदाच असून ही वाढ चालुच आहे.आज 52222 क्यूसेक पाण्याची वाठ झाली. धरण 52.23 टक्के एवढे म्हणजे अर्ध्यापेक्षा अधिक भरले  आहे.दरम्यान औरंगाबादनजिक एक बस रस्त्यावरून वाहणार्या पाण्यात अडकली प्रसंगावधान राखून चालकाने प्रवाशांना तातडीने उतरवून रस्त्याच्या कडेला  सुरक्षित उतरवले तर औरंगाबाद चाळीसगाव मार्गावर घाटात दरड कोसळल्याने खोळंबलेली वाहतूक गवताळा मर्गे वळवण्यात आली.