Breaking News

बिहारमधील सृजन घोटाळ्याची ‘सीबीआय’मार्फत होणार चौकशी

पाटणा, दि, 25, ऑगस्ट - बिहारमधील 1200 कोटी रूपयांच्या सृजन घोटाळ्याची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाद्वारे होणार आहे. राज्य सरकारने गेल्या  आठवड्यात हे प्रकरण अन्वेषण विभागाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. 
दरम्यान, भागलपूरमधील एका स्थानिक न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी अमित कुमार, त्यांची पत्नी प्रिया, भारतीय जनता पक्षाचे नेते विपिन शर्मा आणि  त्यांची पत्नी, राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते दीपक वर्मा आणि त्यांच्या पत्नीसह सृजनच्या काही पदाधिका-यांविरूध अटक वॉरंट जारी केले आहे. या घोटाळ्याचे  मुख्य सूत्रधार अमित कुमार आणि त्यांची पत्नी प्रिया आहे. या प्रकरणी 13 जिल्हाधिकारी आणि 6 उपायुक्तांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती बिहार  पोलिसांनी दिली.