Breaking News

देशभरात स्वाईन फ्लूमुळे 1,094 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, दि, 25, ऑगस्ट - देशभरात स्वाईन फ्लूमुळे तब्बल 1 हजार 94 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. तर, ऑगस्टमध्ये स्वाईन फ्लूमुळे सुमारे 342  जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून स्वाईन फ्लूसंबंधी आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौ, गाझियाबाद, मेरठ आणि  गौतमबुद्ध नगर जिल्ह्याला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समजते. गुजरात आणि महाराष्ट्रातही स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. गुजरातमध्ये 437 तर, महाराष्ट्रात  269 जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. यासह राजस्थान, केरळ आणि दिल्लीतही स्वाईन फ्लूमुळे अनेक जणांचा बळी गेला आहे. उत्तर प्रदेशात स्वाईन  फ्लूमुळे 36 जणांचा मृत्यू झाला असून 1 हजार 365 जणांचा स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.