Breaking News

शेवगावात गणपती उत्सव...

शेवगाव, दि. 26, ऑगस्ट - प्रतिनिधी - गणेशमुर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशीही शेवगावात पावसाने हजेरी लावल्याने आज शुक्रवारी मोठया उत्सहात व मोठया प्रमाणात  श्रीगणेशाची स्थापना कऱण्यात आली.
शेवगावला गणेश उत्सवाची समृध्द परंपरा असून येथे बापु दादाजी लाटे यांनी 1895 साली पहिला गणपती बसविला होता. या गणपतीला आज 122 वर्ष झाली  आहेत. या व्यतिरीक्त राजभोई पंच मंडळ , माळगल्ली सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, खालच्या वेशीतील भगतसिंग गणेश मंडळ, इंदिरा नगरमधील महादेव तरुण  मंडळ, टिळक युवा मंडळ, नेता सुभाषचंद्र मित्र मंडळ, गजराज ग्रामविकास प्रतिष्ठाण, समर्थ क्रिडा मंडळ, हनुमान गणेश मंडळ, स्वराज मंडळ तसेच हातगावचा  शेषनारायण गणेश मंडळ, मुंगीचा आदय गणेश सांस्कृतिक क्रीडा मंडळ ही गणेश मंडळे जुनी आहेत.
शेवगाव शहरातील नेवासे रस्त्यावरील धुत जिनींग प्रेसमध्ये 17 स्टाँल लावण्यात आले असले तरी शहरात मुख्य बाजारपेठेतही गणेश मुर्ती विक्रीसाठी ठेवण्यात  आल्या होत्या. यामध्ये 20 रुपयांपासुन पासुन ते 31 हजार रुपयांपर्यंत श्री गणेशाच्या मुर्ती विकण्यात आल्या. तसेच प्रतिष्ठापणेसाठी लागणारे सजावटीचे  साहीत्याचीही मोठया प्रमाणात विक्री झाली. तालुक्यातील व शहारतील गणेश मंडळांनी रात्री उशीरा पर्यंत भरपावसात वाजतगाजत श्री गणेश मुर्तींची प्रतिष्ठापणा  केली.