Breaking News

अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु

नेवासा़, दि. 26, ऑगस्ट - तालुक्यातील पश्‍चिम भागातील मुळाथडी परीसरातील दि.19 व 20 रोजी झालेल्या अतिवृष्टीने शेतकर्‍यांचे सोयाबीन, कपाशी, बाजरी,  घास, ऊस, मुग, उडिद या पिकाबरोबरच बर्‍याच शेतकर्‍यांच्या विहीरी खचून गेल्या तसेच काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह बदलल्याने विहिरी बुजल्या. राहत्या घरांचे  मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या आदेशानुसार नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. 
नेवाशाचे तलाठी श्रीमती बांगर, करजगावचे पोलीस पाटील प्रकाश मोरे, पानेगावचे पोलीस पाटील बाबासाहेब जंगले, करजगावचे माजी सरपंच अशोक टेमक, प्रशांत  पुराणे, पानेगावाचे सरपंच हौशाबापू जंगले, पानेगावचे ग्रामसेवक गणेश डोंगरे, कचरू जंगले, शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष किशोर जंगले आदींनी दोन दिवसापासून  करजगाव, पानेगाव व परीसरातील गावातील  पंचनामे सुरु केले आहेत. याभागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे महसूल तसेच कृषी विभागाकडून संयुक्त  पंचनामे करण्यात येणार असल्याचे नेवासेचे तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान, या प्रक्रियेत खर्‍या शेतकर्‍यांना न्याय मिळणार असल्याचे मुळाथडी  पाणी आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना जास्तीतजास्त मदत शासनाने द्यावी, अशी मागणी माजी सरपंच  पाराजी गुडधे, तसेच कै. पोपटराव जंगले संस्थेचे संचालक भारत जंगले यांनी केली.