Breaking News

महाराष्ट्र शासनाकडून शेतकरी अपघात विमा योजना

10 ते 75 वयोगटातिल शेतकरी पात्र! स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने योजना!

अहमदनगर, दि. 26, ऑगस्ट - जिल्ह्यामधे शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.शेती करताना नैसर्गिक आपत्ती व अपघात यामुळे मृत्यू झालेल्या किवा अपंगत्व आलेल्या  शेतकर्यांस किवा त्यांच्या कुटुंबियास आर्थिक लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना कार्यान्वित केली आहे.
शेती व्यवसाय करताना बर्याचदा शेतकर्यांचा मृत्यू ओढवतो किवा कायमचे अपंगत्व येते.अपघातग्रस्त शेतकर्यांची व कुटूंबियांचि उत्पन्नाची साधने बंद होतात. आर्थिक  अडचणी उभ्या रहातात. या कुटूंबियांना हा लाभ दिला जातो.सदर योजना दहा ते पंच्चाहत्तर वयोगटासाठी लागू आहे.
या योजनेद्वारे शेतकर्यास अपघाती मृत्यू झाल्यास किवा दोन डोळे ,दोन अवयव अथवा एक डोळा एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये आणि एकच अवयव  किवा डोळा निकामी झाल्यास एक लाखांचा लाभ दिला जातो. शासनातर्फे या योजनेची अंमलबजावणी तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी, जिल्हा स्तरावर  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी,राज्यस्तरावर कृषी आयुक्तालयामार्फत केली जाते.सदर योजना राबवण्यासठी जयका इन्शुरन्स ब्रोकरेज (प्रा.) लिमिटेड या कंपनीस  विमा सल्लागार म्हानुन नेमले आहे.या योजनेचा आर्थिक लाभ अपंग शेतकरी स्वतः किवा मृत शेतकर्याची पत्नी,अविवाहित मुलगी,आई,मुले,नतवंडे,नातेवाईक,विवाहित  मुलगि यांना प्राधान्यक्रमे दिला जातो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी विम्याचा प्रस्ताव लाभधारकांनी विहित नमून्यात पुराव्याच्या कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकार्याकडे द्यावा लागतो.हा प्रस्ताव जिल्हाकृषी  अधिकार्याकडे वर्ग होते.विमा सल्लागार कंपनिच्या मदतिने परिपुर्ण कागदपत्रासह आलेला प्रस्ताव मंजूर होवुन विम्याचि रककम एन इ एफ टी द्वारे वारसदारांच्या  खात्यात जमा केली जाते.
तरि संबंधित अपघातग्रस्त शेतकर्याच्या वारसदाराने सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव कृषी विभागाकडे वेळेत सादर करावेत असे आवाहन  मा.श्री.अभय महाजन,जिल्हाधिकारी अहमदनगर व श्री.पंडित लोणारे, जिल्हा कृषी अधिकारी यांनी केले आहे.

विम्यामधे समाविष्ट असणारे अपघात
रस्ता/रेल्वे अपघात,पाण्यात पडून मृत्यू,विषबाधा,विज पडून मृत्यू,खून,उंचावरुन पडून होनारा मृत्यू,सर्पदंष,विंचूदंष,नक्षलवाद्यांकडून होनारी हत्या,जनावरांचा  हल्ला,दंगल,अपघाती घटना मधे अर्थिक लाभ मिळेल)

लाभधारक शेतकर्याने प्रस्तावासाठी खालील गोष्टी कराव्यात
1) दुर्घटना झाल्यास लवकरात लवकर तालुका कृ षी अधिकार्यांशी संपर्क साधावा
2) अपघाताचे वेळी अपघातग्रस्त व्यक्ती वाहन चालवत असेल तर वाहन परवाना जोडावा
3) प्रस्ताव तालुका कृषी अधिकर्यांकडे सादर करावा,विमा कंपनीकडे परस्पर पाठवू नये
4) प्रस्तावासाठी लागनारी मेळ कागदपत्र व साक्षांकित कागदपत्रे,घोषणा पत्र ब फोटो सहित पाथवावेत
5) सदर योजनेची मुदत 30 नोहेंबर 2017 पर्यंत आहे.अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातांचे प्रस्ताव 90 दिवसांचे आत म्हणजे 27 फेब्रुवारी 2018 पुर्वी तालुका  कृषी अधिकार्यांकडे प्रस्ताव पाठवावेत )

प्रस्तावासाठी जोडावयाची कागदपत्रे
1)   7/12 उतारा
2)   6 ड,फेरफार
3)   लाभ धारकाची वारस नोंद-नमुना 6 क
4)   घोषणापत्र ड्ढअ
5)   वयाचा पुरावा
6)   पोलीस - प्रथम महिती अहवाल
7)   पोलीस-स्थळ पंचनामा
8)   पोलीस-इन्क्चेस्ट पंचनामा
9)   पी.एम.अहवाल
10) मृत्यु प्रमाणपत्र
11) अपंगत्व असल्यास अपंगाच्या टक्केवारीचे प्रमाणपत्र )