लढून मरेन, पण झुकणार नाही : कन्हैय्या कुमार
बीड/अहमदनगर, दि. 07, ऑगस्ट - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिटलर बनण्याचं स्वप्न पाहू नये. तुम्ही ना हिटलर आहात, ना आम्ही गॅस चेंबरमधील यहुदी. आम्ही लढून मरु, पण झुकणार नाही, असा घणाघात विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार याने अहमदनगरमध्ये केला. यावेळी कन्हैय्याने पंतप्रधान मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार टीका केली.
नरेंद्र मोदी पंतप्रधान नसून अंबानी आणि अदानीचे प्रचार मंत्री आहेत. नीता अंबानींबरोबर फोटो काढतात तर जाहिरात का नाही करणार?, असा सवाल कन्हैया कुमारने केला. पंतप्रधान सरकारी कंपनीची जाहिरात करत नाहीत. मात्र खासगी कंपनीचा प्रचार करतात, असा आरोप कन्हैयाने केला. अहमदनगर लाँग मार्चच्या सभेत तो बोलत होता. यावेळी कन्हैयाने आरएसएसच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला. देशभक्तीचा नारा देणार्या संघाच्या किती जणांनी स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलंय?, असा सवाल कन्हैय्याने केला. शिवाय, भगव्या दहशतवादाविरोधात सर्वांनी इंद्रधनुष्यासारखं एकत्रित लढण्याचं अवाहनही कन्हैय्याने केलं.
पंतप्रधानांनी अच्छे दिनची घोषणा केली. मात्र, इंधन, भाजीपाल्याची महागाई वाढली. नोटाबंदीने शंभरपेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला. पंधरा लाख नागरिकांचा रोजगार गेला. तर दुसरीकडे पंधरा लाख खात्यात आलेच नाही. नोटाबंदीनं नक्षलवाद, दहशतवाद संपला नाही., असेही कन्हैय्या म्हणाला. पंतप्रधानांनी ‘सबका साथ सबका विकास’ची घोषणाबाजी केली. मात्र दिवसेंदिवस शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. पण खासगी पीक विमा कंपनीला दहा हजार कोटींचा फायदा झाला., असा दावाही कन्हैय्याने केला.