जिल्हा परिषद शाळांचे शिक्षण चांगले : आरोटे
अकोले, दि. 21 - इंग्रजी माध्यमांपेक्षा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी देशाच्या विविध क्षेत्रात नावलौकीक प्राप्त केले असून शेजारचा मुलगा इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतो म्हणून आपणही आपला मुलगा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतो. मात्र परिस्थितीचा विचार करुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षण सर्वश्रेष्ठ शिक्षण असल्याचे मत चितळवेढे गावचे भूमीपुत्र व नुकतीच अकोले लघुपाटबंधारे उपविभागीय कार्यालयात उपअभियंता पदावर पदोन्नती झालेले आर. डी. आरोटे यांनी व्यक्त केले.
चितळवेढे ग्र्रामस्थांच्या वतीने त्यांचा पदोन्नतीबद्दल सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. धनश्री सोनवणे होत्या. तर व्यासपिठावर माजी सरपंच विश्वंभर आरोटे, ह.भ.प. दशरथ नाना आरोटे, माजी ग्रामपंचायत सदस्य देऊबाई आरोटे, उपसरपंच सौ. थोरात, सदस्य हरीदास आरोटे, मुख्याध्यापिका सौ. कानवडे, ग्रामविकास अधिकारी एस. डी. कोल्हे, किसन आरोटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आरोटे यांनी विकासात्मक कामासाठी गटतट बाजूला ठेवून एकत्र यावे. आपला विकास आपल्याच हातून होणार आहे. शासनाच्या योजनांवर अवलंबून राहण्यापेक्षा शेतीमध्ये विविध प्रयोग राबवित कमी मेहनत व भांडवल वापरुन जादा उत्पन्न मिळविणारे पिके करावीत. शहरी भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी यशाचे कितीही गाजर दाखवले तरी ग्रामीण भागातील शेतकर्यांच्या मुलांसाठी शासनाने जिल्हा प्राथमिक शाळा सुरु करुन आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण देण्यासाठी ही शिक्षण संकुले उभारली आहेत. त्यामुळे आपली शाळा गुणवत्ता वाढविण्यासाठी कर्तव्यदक्ष पालकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन केले.
यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ व फेटा देऊन सत्कार करण्यात आला. त्यांचे पुतणे ज्ञानेश्वर आरोटे हा सीए परीक्षेत उत्तीर्ण झाले व स्नुषा नेट सेट परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्रीमुर्तींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी प्राचार्य ह.भ.प. गिताराम आरोटे, प्रा. शांताराम माकोडे, नामदेव आरोटे, कैलास आरोटे, वसंत आरोटे, निवृत्ती आरोटे, चंद्रशेखर आरोटे, जीवन सोनवणे, यशवंत आरोटे, दगडू आरोटे, बाळासाहेब आरोटे यासंह ग्रामस्थ महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सुत्रसंचालन पोपट शिंदे यांनी केले तर आभार बाळासाहेब बांबळे यांनी मानले.