Breaking News

जिल्ह्यामध्ये 20 शेतकर्‍यांच्या आत्महत्या

नगर -21 - जिल्हयामध्ये शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबायला तयार नाही. अवघ्या 45 दिवसांमध्ये 20 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचा विषय आता गंभीर बनत चालला आहे. मागील वर्षी सर्वाधीक आत्महत्या झाल्यानंतर आता पुन्हा हे सत्र सुरु झाल्यामुळे एकचे खळबळ उडाली आहे.
नगर जिल्हयामध्ये 1 जुलै ते 18 ऑगस्ट पर्यंत 20 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या, या कालावधीमध्ये शेतकर्‍यांचा डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे हे संपायला तयार नाहीत. जिल्हयामध्ये 2003 ते 2016 या कालावधीमध्ये 465 शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. त्यातील 259 शेतकर्‍यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
नगर जिल्हयामध्ये शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र थांबायला तयार नाही. 2016 मध्ये 144 आत्महत्या झाल्या तर 2015 मध्ये 118 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. मदतीसाठी शासनाने निधी सुध्दा त्या त्या वेळी दिला आहे. पण आज बर्‍यांच शेतकर्‍यांच्या कुटुंबांना मदतीसाठी वंचीत रहावे लागत आहे. जिल्हयातील शेतकर्‍यांनी एकवटुन शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासांठी आंदोलनाचा लढा उभारण्यास सुरवात केली व त्याची सुरवात पुलतांबे गावातुन झाली. व त्याचे लोन राज्यभर पसरले. शेतीच्या मालाला हमीभाव मिळावा, स्वामिनाथन आयोगाची शिपासर करावी, शेतकर्‍यांची कर्जमाफी करावी, शिक्षणाचा खर्च द्यावा, लाईटबील माफ करावे, यासाह विविध मागण्या घेवुन आंदोलन छेडण्यात आले. शेतकर्‍यांच्या संपामध्ये केविलवाणा प्रयत्न याच जिल्हयात झाला होता. मात्र शेतकर्‍यांनी आंदोलनावर ठाम राहून सरकारला कर्जमुक्तीसाठी निर्णय घेण्यास भाग पाडले.
या संपामुळे कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले होते. सरकारने 28 जुनला कर्जमाफीचा निर्णय घेतला. शासन निर्णय काढून वेगवेगळ्या अटी शर्ती टाकल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. जिल्हयामध्ये 2 लाखावरुन अधिक शेतकर्‍यांवर आजही कर्ज आहे. कर्जमाफी मिळेल की नाही याबबात शेतकरी अस्वस्थ आहे. त्यामुळे आजही कर्जाला कंटाळुन शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे दिसुन येत आहे. अवघ्या महिनभरामध्ये 20 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यामुळे मोठी घबराट पसरली आहे. श्रीगोंदा, पाथर्डी, संगमनेर, कर्जत, जामखेड, या तालुक्यातील 13 शेतकर्‍यांचा यामध्ये समावेश आहे. सरकारी पातळीवर घोषणा केल्या जातात मात्र त्याची अंमलबजावणी व्हायला तयार नाही. यातुन शेतकरी आता पुरता अस्वस्थ झाला आहे.