Breaking News

कैफियत एक्स्प्रेस अपघात : डंपर चालक व कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली, दि, 25, ऑगस्ट - उत्तर प्रदेशमध्ये कैफियत एक्स्प्रेसला झालेल्या अपघातानंतर रेल्वे पोलिसांनी डंपर चालक व ॠराज कन्स्ट्रक्शन्स कंपनी’चे  कंत्राटदार आलोक दुबे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
उत्तर प्रदेशमधील औरेया जिल्ह्यात बुधवारी पहाटे कैफियत एक्स्प्रेसचे 12 डबे रूळावरून घसरले. या अपघातात आतापर्यंत शेकडो प्रवासी जखमी झाल्याची माहिती  आहे. आठवडाभरात रेल्वे अपघाताची ही दुसरी घटना घडल्याने याकडे प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात आहे.