Breaking News

आक्षेपार्ह छायाचित्र प्रकरणी ऋषी कपूर यांच्या विरोधात तक्रार दाखल

मुंबई, दि. 27, ऑगस्ट - सोशल मिडियावर आक्षेपार्ह छायाचित्र शेअर केल्याप्रकरणी अभिनेते ऋषी कपूर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आला आहे.  ॠजय हो फाऊंडेशन’चे महासचिव ड. आदिल खत्री यांनी तक्रार दाखल केली.
कपूर यांच्या विरोधात मुंबई पोलीस आयुक्त, सायबर विभाग व महिला व बाल विकास मंत्रालयाकडे तक्रारीचे निवेदन पाठवण्यात आले आहे. यामध्ये कपूर यांनी  त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून आक्षेपार्ह छायाचित्र शेअर केले आहे. कपूर यांनी सायबर कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना धडा शिकवणार असल्याचेही खत्री  म्हणाले. कपूर यांचे मोठ्या प्रमाणावर चाहते असून तेवढ्या सर्वांपर्यंत ते छायाचित्र पोचले आहे, असे खत्री यांनी सांगितले. या तक्रारीनंतर कपूर यांनी सदर आक्षेपार्ह  छायाचित्र आपल्या खात्यावरून काढून टाकले.