Breaking News

प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिव्यांग शिवाजी गाढे यांना मारहाण


औरंगाबाद,दि.2 : प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिव्यांग शिवाजी गाढे यांना घाटीे शासकीय रूग्णालयातील सुरक्षा रक्षकाने मारहाण केली असून त्यांच्या डोक्याला चार टाके पडले आहेत.यामुळे घाटी परिसरात आज तणाव होता. सध्या दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी प्रहार या संघटनेचे आंदोलन चालु असून जिल्हा परिषद आवारात सगळे कार्यकर्ते आंदोलन करत होते. दरम्यान काही कारणाने संघटनेचे अध्यक्ष शिवाजी गाढे यांना घाटीत नेण्यात आले त्या वेळी किरकोळ कारणावरून घाटीच्या सुरक्षा रक्षकाने मारहाण केली त्यात त्यांच्या डोक्याला मार लागला. सदर घटना समजताच आंदोलनातील व इतर लोक घाटी परिसरात जमले आणि तणाव निर्माण झाला. एकूण परिस्थितीचा अंदाज घेवून घाटीच्या अधिष्ठाता कानन येळीकर यांनी घटनेच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे.