Breaking News

उद्योजकता विकास केंद्राच्या मानद व्याख्यात्यास लाच घेताना अटक

जालना, दि. 09 - जालना येथील उद्योजकता विकास केंद्रात मानद व्याख्याता म्हणून कार्यरत असणा-याने एका प्रशिक्षणार्थीकडून दोन हजार रूपयांची लाच  स्वीकारताना लाचलुचपत विभागाने अटक केली.
अशोक अण्णाजी सोनवणे (40, रा. शेलगाव, ता. बदनापूर) या व्याख्यात्याने तक्रारदारास बीज भांडवल योजनेअंतर्गत जिल्हा उद्योग केंद्रातून शेळी पालनासाठी पंधरा  लाखांपर्यंतचे कर्ज मिळवून देतो असे सांगून त्याच्याकडून दोन हजारांची लाच घेतली. तक्रारदाराने पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पडेगाव  येथे शेळी पालनाचे प्रशिक्षण घेतले होते.आणि त्याला व्यवसाय करायचा होता.