Breaking News

राम रहिम यांना दोषी ठरविणा-या न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ करा

चंदीगड, दि. 27, ऑगस्ट - साध्वी लैंगिक शोषण प्रकरणात गुरमीत राम रहिम सिंग यांना दोषी ठरविणारे न्यायाधीश जगदीप सिंग यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचे  आदेश केंद्र सरकारने दिले. 
गृह मंत्रालयाने हरियाणा सरकारला न्यायाधीश सिंग यांच्या सुरक्षेत कडक बंदोबस्त करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती एका अधिका-याकडून देण्यात आली  आहे. गृह मंत्रालयाने न्या. सिंग यांच्या सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलीस दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे जवान तैनात केल्याचीही माहिती त्या  अधिका-याने दिली. या प्रकरणी न्यायालयाने निकाल दिल्यानंतर हरियाणात हिंसाचार उसळला. या हिंसाचारात 30 ठार तर, 100 जण जखमी झाले आहेत.