डेरा आंदोलन : ब्रिटन-कॅनडासह तीन देशांकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना
नवी दिल्ली, दि. 27, ऑगस्ट - डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहिम याला शिक्षा सुनावल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारानंतर ब्रिटन-कॅनडासह तीन देशांकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आणखी हिंसाचार होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे ब्रिटन सरकारने कळवले आहे. तर भारतात असणा-या नागरिकांनी सतर्क रहावे असे कॅनडाकडून सांगण्यात आले आहे. भारतात असणा-या नागरिकांनी स्थानिक अधिका-यांच्या संपर्कात राहा, सामाजिक माध्यमांवर लक्ष ठेवा अशा सुचना ब्रिटनकडून देण्यात आल्या आहेत. तर, ऑस्ट्रेलियाकडूनही नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
