Breaking News

प्रशासनाकडून मिरवणूक मार्गावरील रस्त्याची पाहणी

संगमनेऱ, दि. 26, ऑगस्ट -शांतता कमिटी बैठीकीमध्ये चर्चिलेल्या वेगवेगळ्या मुद्यांपैकी शहरातील रस्त्यांची अवस्था या मुद्द्यावर खूपच चर्चा होत असताना  प्रशासनाने याकडे लक्ष देण्याचे ठरविले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने आज मिरवणूक मार्गावरील रस्त्याची पाहणी केली. यावेळी पोलीस उपअधीक्षक अशोक  थोरात, तहसीलदार साहेबराव सोनावणे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, पो. नि. गोविंद ओमासे आदींसह विविध खात्यातील अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
मिरवणूक मार्गात कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी लागणार्‍या उपायांबद्दल चर्चा झाली, तसेच प्रत्येक चौकांत लावण्यात आलेल्या सी. सी. टी. व्ही. कॅमेरांची  पाहणी करण्यात आली. मिरवणूक काळात होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना आखण्यात आली. त्याचबरोबर आरास बघायला आलेल्या भक्तांच्या  सुरक्षेसंबंधी काही निर्देश पो. नि. ओमासे यांनी मंडळाच्या पदाधिकार्‍यांना दिले.