Breaking News

एसआरएतील घोटाळ्याप्रकरणी प्रकाश महेतांनी राजीनामा द्यावा - नीलम गो-हे

मुंबई, दि. 01, ऑगस्ट - झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील तथाकथीत घोटाळ्यातील तथ्य बाहेर यायची असतील तर, त्यासाठी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी  आपल्या पदाचा राजीनामा द्यावा असे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गो-हे यांनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी बोलताना म्हटले. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातील  तथाकथीत घोटाळ्यातील तथ्य बाहेर यायची असेल तर मेहता यांनी चौकशीला सामोरे जाणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांनी सर्वप्रथम मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, असे  त्या म्हणाल्या.
ताडदेव एम्.पी. मिलच्या प्राधिकरण घोटाळ्याच्या प्रकरणात प्रकाश महेता यांनी खात्याच्या सचिवांचा विरोध डावलून विकासकांच्या लाभाचा निर्णय घेत विशेष तरतूद  केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.