Breaking News

दुखापतीमुळे अँडी मरेची ’अमेरिकन ओपन’मधून माघार

लंडन, दि. 27, ऑगस्ट - जागतिक टेनिस क्रमवारीत दुस-या स्थानी असलेला इंग्लंडचा अँडी मरे याने दुखापतीमुळे प्रतिष्ठेच्या अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतून  माघार घेतली आहे. स्पर्धेला दोन दिवस शिल्लक असताना त्याने हा निर्णय जाहीर केला आहे. 2013पासून प्रथमच अँडी मरेने ग्रँडस्लॅम स्पर्धेतून माघार घेतली आहे.  नुकत्याच झालेल्या विम्ब्लडन स्पर्धेत दुखापतीमुळे त्याला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर त्याने कोणत्याही स्पर्धेत सहभाग घेतला नाही. अमेरिकन खुल्या  टेनिस स्पर्धेसाठी त्याने आठवडाभर सराव केला. मात्र स्पर्धेसाठी तो अजूनही तंदुरूस्त नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला.