Breaking News

देव नदीवरील बंधारा फुटल्याने पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता

सिन्नर, दि. 27, ऑगस्ट - देवनदीवरील दातली येथील साठवण बंधारा अचानक फुटल्यामुळे येथे पाण्याची गंभीर समस्या उद्भवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  काही दिवसांपूर्वीच हा बंधारा भरल्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले होते.
देवनदी दुथडी भरुन वाहू लागल्याबरोबर शेतक-यांना झालेला आनंद फार काळ राहीला नाही. कमलाकर शिंदे यांच्या शेतालगत असलेला साठवण बंधारा फुटल्याने  सर्व साठलेले पाणी वाहून गेले.
बंधा-याच्या पाण्यावर आवलंबून असणा-या शेतक-याचे नुकसान झाले आहे. या देव नदीवरील साठवण बंधा-याची त्वरीत दुरुस्ती करण्याची मागणी सरपंच  उज्वला नागरे, उपसरपंच ज्ञानेश्‍वर नागरे सदस्य धनराज कुटे माजी सरपंच लहानु भाबड, कमलाकर शिंदे आदींसह दातली केदारपुर परिसरातील ग्रामस्थांनी केली  आहे.