स्वातंत्र्यदिनी गावकर्यांच्या उपस्थितीत ई लर्निंगचे उद्घाटन
बुलडाणा, दि. 21 - तालुक्यातील आमदार आदर्श ग्राम आडगाव राजा येथिल जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा ग्रामपंचायत व गावकरी यांच्या प्रयत्नाने डिजिटल झाली असून रितसर उद्घाटन सरपंच सौ.मंदाकिनी भागवतराव वाघमारे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.कालिंदा संजय कहाळे यांच्या हस्ते गावकर्यांच्याउपस्थितीत करण्यात आले. आजच्या स्पर्धेच्या युगात काळानुरुप शिक्षण प्रणाली आत्मसात व्हावी, हा उदात्त हेतु समोर ठेऊन जिल्हा परीषदेच्या शाळा डिजीटल होत आसतानाच 15 ऑगस्ट रोजी रोजी सकाळी ध्वजारोहणानंतर सरपंच सौ.मंदाकिनी भागवत वाघमारे व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.कालिंदा संजय कहाळे व सर्व गावकरी यांच्या उपस्थितीत दोन ई लर्नीग संचचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भागवतराव वाघमारे, अरविंद सोनुने, पिराजी महाराज, रूस्तुमराव झोरे, पुरूषोत्तम सोनुने, दिनकर चव्हाण, निलेश शिनगारे पो.पा., प्रकाश सोनुने, कृष्णा चव्हाण, नरेंद्र कहाळे, उत्तम चव्हाण यांच्यासह ग्रामसेवक चद्रंकात बोरूळ, तलाठी गव्हाणकर, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र सोनुने, डि.बी.खरात, एल.एम.तायडे, रेनाकाळे, हरदास सर आदी शिक्षक, आंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी ग्रा.पं.अडगावराजा यांचे कडून मिळालेल्या 2 स्मार्ट टी.व्ही. तसेच शाळेतील सर्व शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती व गावकरी यांच्या योगदानातून तयार करण्यात आलेल्या दोन ई-लर्निंग कक्षाचे उदघाटन संपन्न झाले.