Breaking News

कुटूंबातील महिला आरोग्य संपन्न असणे महत्वाचे ठरते : अ‍ॅड.वृषालीताई बोंद्रे

बुलडाणा, दि. 21 - कुटूंबातील महिलांचे आरोग्य निटनेटके असले म्हणजे संपुर्ण कुटूंबाचा गाडा व्यवस्थीत चालतो आणी कुटूंबही आरोग्य संपन्न राहुन प्रगतीच्या वाटेवर अगे्रसर राहते. ग्रामीण भागात तर कुटूंबाचे आरोग्य राखणे अतिशय महत्वाचे असून त्यासाठी कुटूंबातील महिला आरोग्य संपन्न राहणे अतिशय महत्वाचे आहे. आणी नेमकी हीच बाब हेरून आपल्या परिसरातील महिलांना आरोग्याचे वरदान देण्यासाठी सहाय्यभुत ठरणारे योग शिबीर तथ योग प्रशिक्षीकांचे देखरेखी खाली सिध्देश्‍वर संस्थान कोलारा यांनी आयोजित केले आहे. आणी त्याला मोठया प्रमाणावर प्रतिसादही महिलांनी दिला आहे ही अतिशय आनंदाची बाब होय, याच प्रकारे इतरत्रही योग प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला गेला पाहीजे असे उद्गार हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा अ‍ॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे यांनी सिध्देश्‍वर संस्थान कोलारा येथे आयोजित योग प्रशिक्षण शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना काढले. यावेळी योग प्रशिक्षीका सौ. शारदाताई वानेरे, पंचायत समिती सदस्या सौ. मनिषाताई सपकाळ, कोलारा सरपंच सौ. मंदाताई खंडारे, माजी सरपंच सौ. अलकाताई सोळंकी, ग्रा.प.सदस्या सौ. संगिताताई मंडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
चिखली तालुक्यातील सुप्रसिध्द सिध्देश्‍वर महाराज संस्थान, कोलारा येथे ग्रामीण भागातील महिलांसाठी  योग प्रशिक्षण शिबीराचे आयोजन दिनांक 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या दरम्यान संस्थानच्या सभामंडपात संस्थांनच्या वतीने करण्यात आले आहे. जवळपास 250 चे वर महिलांचा सहभाग असलेल्या या शिबीरासाठी तज्ञ मार्गदर्शीका म्हणून सौ. शारदाताई वानेरे या प्रख्यात योग प्रशिक्षीकेचे मार्गदर्शन शिबीरात सहभागी महिलांना लाभणार आहे. दिनांक 13 ऑगस्ट 2017 रोजी या शिबीराचे उद्घाटन चिखली तालुक्यात योग प्रसाराचे कार्यात सक्रीय हातभार लावणार्‍या हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठाणच्या संस्थापक अध्यक्षा अ‍ॅड सौ. वृषालीताई बोंद्रे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या शिबीरात संपुर्ण सप्ताहभर दररोज सकाळी 6 ते  8 या वेळेत नियमीत दोन तास महिलांना दैनदिन जिवनात करता येणारे सहजसोपे योग शिकवीण्यात येणार असून महिलांच्या दैनदीन योगामुळे त्यांचे नित्याचे आयुष्यात मोठा बदल घडून त्यांच्या स्वत:चा आरोग्या बरोबरच त्यांच्या कुटूूंबियाचे आरोग्यही सुव्यवस्थीत राखण्यासाठी याची मदत होणार आहे.