Breaking News

तात्काळ तिकीट आरक्षित करणा-यांसाठी ‘पे ऑन डिलीव्हरी’ची सेवा सुरु

नवी दिल्ली, दि. 03, ऑगस्ट - रेल्वेचे तात्काळ तिकीट आरक्षित करणा-या प्रवाशांसाठी ’आयआरसीटीसी’ ने ‘पे ऑन डिलीव्हरी’ ही नवीन सेवा सुरु केली आहे.  तात्काळ तिकीट आरक्षित करणारे प्रवासी बुक नाऊ पे लेटर या पर्यायाचा वापर करु शकतात, अशी घोषणा ड्युरिल टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने आज केली.
’आयआरसीटीसी’ च्या माध्यमातून तिकीट आरक्षित केल्यानंतर कॅश किंवा डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तिकीटाची रक्कम भरता येणार आहे. पे ऑन  डिलीव्हरीची सेवा आतापर्यंत सर्वसाधारण आरक्षणासाठी पुरविण्यात येत होती. मात्र आता ही सेवा तात्काळ तिकीट आरक्षित करण्यांनाही पुरविण्यात येणार आहे.  ‘पे  ऑन डिलीव्हरी’ चा उपयोग ऑनलाईन माध्यमातून तिकीट आरक्षित करणा-या प्रवाशांना होणार असून तिकीटाचे दर मात्र ऑनलाईन माध्यमातून न करता रोख  रक्कमेत करावे लागणार आहे.