Breaking News

बिहारमध्येही काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता; काही आमदार भाजपमध्ये जाणार ?

पाटणा, दि. 3, ऑगस्ट - गुजरातप्रमाणे बिहारमध्येही काँग्रेसच्या आमदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे काही आमदार भारतीय जनता पक्ष -जनता  दल युनायटेडच्या संपर्कात असल्याचे समजते. सध्या बिहारमध्ये काँग्रेसचे 27 आमदार असून यातील 9 आमदार भाजप - संयुक्त जनता दलाच्या संपर्कात आहेत.
बिहारमध्ये भाजप-जदयूचे सरकार स्थापन झाल्यापासून काही आमदार संयुक्त जनता दलाच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
गुजरातमध्ये राज्यसभा निवडणुकीआधीच ज्येष्ठ नेते शंकर सिंग वाघेला यांच्यासह काँग्रेसच्या 6 आमदारांनी राजीनामा दिला आहे.