Breaking News

नगरसेवकांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता, संपर्कप्रमुख शहरात दाखल

नांदेड, दि. 21, ऑगस्ट -  नांदेड वाघाळा महापालिका निवडणूकीच्या पार्श्‍वभूमिवर शिवसेनेच्या काही नगरसेवक आणि पदाधिकार्यांनी शिवसेनेला रामराम  ठोकून भाजपचा रस्ता धरल्याने शिवसेनत कमालिची अस्वस्थता असून या पार्श्‍वभूमिवर मुंबई येथे झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीनंतर शिवसेनेचे  संपर्कप्रमुख आनंद जाधव हे नांदेडात डेरेदाखल झाले आहेत. अनेकांनी सेनेला रामराम ठोकल्याच्या पार्श्‍वभुमिवर जाधव यांनी काल तातडीने प्रभागनिहाय  कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या.या वेळी गेल्या काही दिवसांपासून नांदेडचे राजकारण ढवळून निघाले आहे़ शंभर कावळ्यांना मुठभर मावळे जमिनीत गाडतील,  पळपुट्यांना जनताच धडा शिकवेल असे ते म्हणाले. यंदाच्या निवडणूकी कॉग्रेसपेक्षा भाजपवर शिवसेनेने टीकास्त्र सोडण्यास सुरूवात केली आहे.प्रत्येक  निवडणुकी अगोदर दुसर्याच्या घरात वाकुन पाहणे भाजपचा सवयीचा भाग असल्याची टीकाहीत्यांनी केली.या आधी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी हि  भाजपवर तोफ डागली होती.यावरून भाजपच्या इनकमिंगमुळे शिवसेनेची अस्वस्थता वाढल्याची लक्षात येते नारायण राणे यांचे नाव न घेता ज्यांनी सेना  सोडली त्यांची अवस्था काय झाली? हे सर्वांनी पाहिले आहे़,अशी टिकाही या वेळी करण्यात आली.